Breaking Politics | मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी!
शिवसेना करणार प्रभाग रचनेवर हरकती
Share
Breaking Politics | मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी!
शिवसेना करणार प्रभाग रचनेवर हरकती
अहिल्यानगर : मनपा निवडणुकीचा बिगुल वाजलाय! ठाकरे शिवसेना आता पूर्ण ॲक्शन मोडमध्ये असून, मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेण्याची तयारी सुरू केली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत असताना शहरप्रमुख किरण काळे यांनी स्पष्ट सांगितलं – “मनपावर भगवा फडकवायचा निर्धार केला आहे. योग्य वेळी रणनीती ठरवून ताकदीने निवडणुकीला सामोरं जाऊ!”
२०१८ च्या निवडणुकीत शिवसेनेनं २४ नगरसेवक निवडून आणले होते, तर अनेक जागांवर थोड्या मतांनी पराभव झाला. म्हणजेच शहरात शिवसेनेचं भक्कम जनाधार आजही कायम आहे.
इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू! – शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि नवीन चेहरे उमेदवारीसाठी संपर्कात आहेत. अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात येईल, आणि त्यानंतर उमेदवार निश्चितीला वेग मिळेल.
आघाडी की स्वबळावर? – सध्या कोणताही निर्णय नाही. काळे म्हणाले, “महाविकास आघाडीत लढलो, पण शहरात आमचं अस्तित्व कायम ठेऊनच पुढे पाऊल टाकणार. स्वबळावर लढायचं की आघाडी करायची, हे वरिष्ठ ठरवतील.”
Bottom Line: ठाकरे शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. हरकती, उमेदवारांची चाचपणी आणि रणनीतीची आखणी – सगळं गुपचूप पण जोरदार सुरू आहे.