बुऱ्हाणनगरमध्ये टोळक्याचा तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला – ‘खुन्नस’मुळे रक्तरंजित हाणामारी!

 पोलिसांनी तातडीने कठोर पावलं उचलून नागरिकांचा विश्वास मिळवावा, अशी मागणी होत आहे.

बुऱ्हाणनगरमध्ये टोळक्याचा तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला – ‘खुन्नस’मुळे रक्तरंजित हाणामारी!

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर परिसरात केवळ “पाहतोस काय?” या कारणावरून एका १८ वर्षीय तरुणावर ७ जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २९ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजता जगदंबामाता मंदिराच्या पाठीमागील कमानीजवळ घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फिर्यादी रेहान गालीब खान (वय १८, रा. बुऱ्हाणनगर) याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे, सलमान रफिक शेखकार्तिक कर्डिलेसिद्धार्थ नवलेगौरव कर्डिलेरोहन शिंदेदत्ता तापकिरे आणि संदीप निमसे या सात जणांनी मिळून त्याला अडवले. त्यानंतर शिवीगाळ करत, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सलमान शेख याने धारदार कोयत्याने रेहानच्या पाठीवर आणि उजव्या हातावर वार केला. “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकीही दिली.

या भयंकर हल्ल्यात रेहान गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे विविध कलम आणि आर्म अ‍ॅक्ट ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार कविता हरिश्चंद्रे करत आहेत.

📢
 स्थानिक तरुणांमध्ये रस्त्यावरची ‘दादागिरी’ वाढतेय का?
📍 पोलिसांनी तातडीने कठोर पावलं उचलून नागरिकांचा विश्वास मिळवावा, अशी मागणी होत आहे.

 

#Burhannagar #CrimeAlert #KnifeAttack #MetroPortalBreaking #JusticeForRehan #SafeStreetsNow