अधिकाऱ्यांना बोलावले विखे पाटलांनी… पण पळवले आमदार ओगल्यांनी! 

श्रीरामपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या सर्वेक्षणावरून चांगलाच राजकीय गोंधळ!

📢
 अधिकाऱ्यांना बोलावले विखे पाटलांनी… पण पळवले आमदार ओगल्यांनी! 😮🔥

श्रीरामपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या सर्वेक्षणावरून चांगलाच राजकीय गोंधळ!

श्रीरामपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामासाठी गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण नियोजित होतं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर अधिकारी श्रीरामपूरला रवाना झाले. मात्र, शहरात पोहोचताच स्थानिक आमदार हेमंत ओगले यांनी थेट हस्तक्षेप करत अधिकारी ‘हायजॅक’ केले आणि त्यांना स्वतःच्या गाडीतून स्मारकस्थळी नेले!

क्लायमॅक्स काय? ओगले यांनी माध्यमांसमोर स्टेटमेंट दिलं, फोटो काढले आणि पूर्ण श्रेय घेतल्याचा देखावा केला!
हा प्रकार पाहून आंबेडकरी समाज संतप्त झाला, आणि पुतळा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्यासह संपूर्ण टीमने या ‘श्रेय लाटणाऱ्या’ नाट्याचा तीव्र निषेध केला.

समितीचा थेट इशारा – “पुन्हा असं केल्यास स्मारकाच्या परिसरात पाऊल ठेवू देणार नाही!”

त्रिभुवन, भीमराज बागुल, सचिन ब्राम्हणे, संतोष मोकळ, प्रकाश ढोकणे, अमोल काळे, किशोर ठोकळ यांच्यासह सर्व सदस्य एकवटले, आणि “खोटा कळवळा नको – खरं काम हवं!” असा ठाम संदेश दिला.

विशेष म्हणजे, या सर्वेक्षणासाठी आधीच ठरलेलं वेळापत्रक समितीला कळवलेलं होतं. सदस्य तिथे वेळेवर हजर होते, पण अधिकारी आलेच नाहीत! चौकशी केली, तर समजलं की ‘ते ओगले साहेबांसोबत गेलेत!’

दुपारी २ वाजता झालेल्या अधिकृत बैठकीस आमदार ओगले गैरहजर होते. तिथेच सर्व तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाली – पण जे खऱ्या कामात नव्हते, ते फक्त कॅमेऱ्यासाठी होते!

📣 मेट्रो पोर्टलचा सवाल – विकासाचं श्रेय खऱ्या कार्यकर्त्यांना मिळणार की ‘फोटो फ्रेम’ प्रेमी नेत्यांना?