“तूर”चा बंपर प्लॅन!

शेतकऱ्यांनो, भरघोस उत्पादनासाठी ‘ही’ माहिती वाचाच! 🚜💥

🌱
“तूर”चा बंपर प्लॅन! शेतकऱ्यांनो, भरघोस उत्पादनासाठी ‘ही’ माहिती वाचाच! 🚜💥

📍 सोनई, जिल्हा नगर:
खरीप हंगामात तुरीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता ओढा पाहता आता वेळ आलीय ‘स्मार्ट फर्मिंग’ची! मागील काही वर्षांत तुरीच्या दरात आणि लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालीय. शेतकरी आता आधुनिक तंत्र, खत व पाण्याचं अचूक व्यवस्थापन, आणि कीड-रोगांवर उपाय करत चांगलं उत्पादन घेत आहेत.


✅ तुरीत भरघोस उत्पादनासाठी ‘हे’ ५ टॉप टिप्स:

🔹 1. खत व्यवस्थापन:
२५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद (१२५ किलो DAP) पेरणीवेळी द्या. फुलोऱ्याच्या वेळी मल्टीन्यूट्रिएंटची फवारणी करा.

🔹 2. पाणी व्यवस्थापन:
पाऊस नसलं, तर ३०-३५, ६०-७० व शेवटच्या शेंगा भरताना सिंचन द्या. ठिबक असल्यास दिवसाआड पाणी द्या.

🔹 3. तण नियंत्रण:
पेरणीनंतर १५-२० व ३०-४५ दिवसात कोळपणी/खुरपणी करा. ‘स्टॉम्प प्लस’ किंवा ‘इमॅझामॉक्स’ तणनाशकाचा वापर फायदेशीर.

🔹 4. रोग प्रतिबंध:
वांझ रोग टाळण्यासाठी रोग प्रतिकारक वाण वापरा. झाडे व रोग पसरवणाऱ्या कोळ्यांवर नियंत्रण ठेवा.

🔹 5. कीड नियंत्रण:
फुलोऱ्याच्या वेळेस घाटेअळी व इतर किडींवर लक्ष ठेवा. निंबोळी अर्क + HNPV फवारणी, तसेच पक्षीथांबे व कामगंध सापळ्यांचा वापर करा.


📢 शेतकऱ्यांनो, ही माहिती शेअर करा – दुसऱ्यांचंही उत्पन्न वाढू द्या!

#तूरमहास्ट्रॅटेजी #SmartFarming #Kharip2025 #MetroAgroNews

 

👉 अजून अपडेट्ससाठी फॉलो करा: @MetroAgroNews