रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न
अहमदनगर : रुपीबाई मो.बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्य व उच्च माध्य विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठान संचलित आरंभ पॅलिएटिव्ह, कॅन्सर केअर सेंटर तज्ञ मार्गदर्शकच्या मार्फत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ होते, आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता आरंभ कॅन्सर जनजागृती सेंटरच्या कॅन्सर तज्ञ डॉ.जुनागडे तेजश्री या होत्या. आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना कॅन्सर विषयी माहिती दिली. प्राथमिकस्तरात कॅन्सरचे योग्य निदान झाले तर तो पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो, तसेच आपल्या आरंभ या कॅन्सर जनजागृती सेंटर तर्फे विविध पुरविल्या जाणार्या सोयीसुविधा यांची माहिती दिली. अगदी शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर पेशंटला वेदनारहित आनंदी उपचार निशुल्क करण्यात येईल असे सांगितले. आरंभ कॅन्सर सेंटर विषयी अधिक माहिती प्रदिप काकडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच संबंधित सेंटरच्या जनजागृती अधिकारी सौ. दिपाली पाटोळे या देखील उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.आरण्ये वंदना आणि पर्यवेक्षक वाबळे बाळासाहेब यांचे मार्गदर्शन लाभले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाहक श्रीमती छायाताई फिरोदिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोकजी मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, स्कूल कमिटीचे चेअरमन गौरव मिरिकर, सल्लागार भूषण भंडारी यांनी कॅन्सर जनजागृती कार्यक्रम राबविल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.