ईशा एंटरप्रायजेसच्या १९ व्या वर्धापन दिनी , नचिकेत बालग्रामला सी सी टी व्ही भेट.
... त्यामुळेच या संस्थेला सी सी टी व्ही आणि परिसर सुरक्षा उपकरणाची खूप गरज होती
पुणे :
पुण्यासह महाराष्ट्रात सी सी टी व्ही आणि सुरक्षा तंत्रज्ञानात मोठे नाव असलेल्या ईशा एंटर प्रायजेस , वल्ड ऑफ टेक्नॉलिजीचा १९ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . यानिमित्ताने कंपनीच्या सी एस आर फंडातून चिंचवड येथील नचिकेत बालग्राम या संस्थेला सी सी टी व्ही यंत्रणा भेट देण्यात आली .नचिकेत बालग्राम ही संस्था शेकडो निराधार बालकांना आधार देते . त्यांचे शिक्षण आणि संगोपनाचे काम करते . त्यामुळे या संस्थेला सी सी टी व्ही आणि परिसर सुरक्षा उपकरणाची खूप गरज होती . हे लक्षात घेऊन इशा एंटर प्रायजेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मुथा यांनी ही मदत करण्याचा निर्णय घेतला निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना मदत करण्यासाठी वेळोवेळी पुढे आले पाहिजे त्यासाठी आपण हा मदतीचा हात पुढे केल्याचे राहुल मुथा यांनी म्हंटलेआहे.
See This Also