रमी खेळणाऱ्या मंत्र्यावर काय कारवाई होणार? रिपोर्ट सरकारकडे, पण जनतेपासून लपवणार?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमीप्रकरणी समितीचा अहवाल अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सादर!

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमीप्रकरणी समितीचा अहवाल अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सादर!
व्हिडीओमध्ये १८ ते २२ मिनिटे सभागृहात गेमिंगचा स्पष्ट पुरावा — आणि तरीही सरकार शांत?
रोहित पवार यांचा थेट सरकारवर हल्ला –
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी मंत्री रमी खेळतात? हे वर्तन योग्य आहे का?”
“सरकार अहवाल जाहीर का करत नाही?” – नैतिकतेवर रोखठोक सवाल!
अजित दादा आणि फडणवीस यांना थेट विचारणा:
“तुम्ही वाजपेयी आणि चव्हाणांचा वारसा सांगता, आता मंत्र्यावर कारवाई करणार की राजकारण करणार?”
आता सगळ्यांच्या नजरा आहेत सरकारच्या पुढच्या निर्णयावर –
कोकाटे यांचं मंत्रीपद वाचणार की जाणार?
बातमी जनतेसमोर यावी, कारण लोकशाहीत पारदर्शकतेला पर्याय नाही!