हक्क वंचित मुलांसाठी स्नेहालय परिवाराची विद्या सहयोग शिष्यवृत्ती.

विविध हक्कवंचित समूहातील विद्यार्थ्यांना रोजगार आणि उच्च शिक्षणाची संधी मिळावी

अहमदनगर ,दिनांक २३फेब्रुवारी २०२१ : विविध हक्कवंचित मुलांसाठी समूहातील विद्यार्थ्यांना रोजगार आणि उच्च शिक्षणाची संधी मिळावी ,यासाठी विद्या सहयोग शिष्यवृत्ती ची घोषणा स्नेहालय परिवारातर्फे आज करण्यात आली. शिक्षण पूर्ण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांनी या मदतीची बिनव्याजी परतफेड करावयाची आहे. करोना संकटामुळे ज्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले, त्यांना या योजनेमुळे आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करणे शक्‍य होणार आहे.सर्व जातीधर्मातील अनाथ-लालबत्ती विभाग ,झोपडपट्ट्यांमध्ये, विविध अनाथ आश्रमातून  राहणारी बालके, दिव्यांग-एचआयव्ही बाधित-बाल मजुरी आणि लैंगिक शोषणातून मुक्त बालकांना-बालविवाह  मुक्त  मुली – बाल माता यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने मिळणार आहे.

परंतु याशिवाय कुठल्याही आर्थिक दुर्बल घटकातील बालक अथवा  युवकांनाही या योजनेतून शिक्षणासाठी अर्थ सहयोग दिला जाणार आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला मुलांसाठी  एक मार्गदर्शक पालक कार्यकर्ता दिला जाणार असून ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्यांना मदत व मार्गदर्शन करतील. अशा प्रकारच्या उपक्रमात स्वयंसेवकांचे काम करू इच्छिणाऱ्या मार्गदर्शक पालकांची नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे.समाजसेवा ,वैद्यकीय, अभियांत्रिकी ,फार्मसी ,कायदा ,व्यवस्थापन,नर्सिंग आदी अभ्यासक्रमात जर शासकीय कोट्यातून कोणी गुणवत्तेवर प्रवेश मिळवला असेल ,तर अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क या उपक्रमातून भरले जाईल. परंतु खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये आणि  देणगी भरून शिक्षण घेणाऱ्यांना या उपक्रमातून विद्या सहयोग मिळणार नाही. निवास-भोजनाच्या सुविधांबाबत विद्या सहयोग टीम मार्गदर्शन देईल.

Also see this and subscribe 

या उपक्रमांतर्गत सहयोग दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिबिर, सेवा प्रकल्प भेटी,चारित्र्य निर्माण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमाव्दारे रोजगार कौशल्याचे लहान मुदतीचे अभ्यासक्रम  शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना ठाऊक नसलेले रोजगार शिक्षणाचे अनेक  पर्याय सुचवले जाणार आहेत.कॅनडा येथील उद्योजक टॉम लेविट, पुणे येथील सॅप पार्ट या कंपनीचे संचालक प्रसाद कुलकर्णी , मुंबई येथील रमेश कचोलिया आणि केअरिंग फ्रेंड्स नेटवर्क , यांनी या उपक्रमासाठी प्राथमिक आर्थिक सहयोग दिलेला आहे. याशिवाय अनेक व्यक्तिगत दात्यांनी गरजू आणि गरीब मुलांसाठी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.यंदाच्या वर्षी सुमारे ५० लक्ष रुपये विद्या सहयोग म्हणून वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या १० मार्च पर्यंत या उपक्रमांतर्गत आर्थिक सहयोग मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन राजीव गुजर, संजय गुगळे, अजित माने ,अजित कुलकर्णी,अनंत झेंडे, अनिल गावडे, जयकुमार मुनोत, हनीफ शेख , फारूक बेग,सचिन खेडकर ,प्रवीण मुत्याल ,राजेंद्र शुक्रे ,राजीव कुमार सिंग, अॅड शाम आसावा , डॉ.कृष्णा पाटील, प्रा.प्रमोद तांबे , डॉ.दया भोर,डॉ.अंकुश आवारे यांच्या ‘विद्या सहयोग’ समन्वय समिती ने केले आहे.या संदर्भातील अर्ज पुढील पत्त्यावर उपलब्ध आहेत.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.