मातंग समाजाच्या बैठकित समाजातील विविध प्रश्‍नांवर विचारमंथन

महापौर रोहिणीताई शेंडगे यांचा नागरी सत्कार

 

अहमदनगर:

 

कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मातंग समाजाचे प्रश्‍न अधिक गंभीर बनले आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी समाजबांधवांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.  विविध राजकीय व संघटनेत काम करताना मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंचकमिटीचे अध्यक्ष मधुकरराव पठारे यांनी केले. महापौर  तर प्रश्‍नांची सोडवणुक करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.. 

 

शहरातील माळीवाडा येथील महालक्ष्मी देवस्थान येथे जिल्ह्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षीय भाषणात पठारे बोलत होते. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहिणीताई शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंचकमिटी, महालक्ष्मी देवस्थान व अ‍ॅक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोपटराव धोंडीबा साठे, दिनकर सकट, साहेबराव पाचारणे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, उद्योजक बाळासाहेब मोरे, प्रमोद वाघमारे, नामदेवराव चांदणे, प्रा.बाबासाहेब शेलार, चंद्रकांत कांबळे, डी.जी. साठे, सचिन मोरे, विजय वडागळे, बापू कसबे, भगवानराव गोरखे, लखन साठे, रवी साठे, संदीप पारदे, नितीन राजगुरू, उमेश साठे, सुनिल सकट, विनायक वैराळ आदी समाज बांधव उपस्थित होते.

 

पंच कमिटीचे उपाध्यक्ष साहेबराव पाचरणे म्हणाले की, समाज संघटित झाल्याशिवाय समाजाचे प्रश्‍न सुटणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे मातंग समाज सावकारी पाशात अडकला आहे. टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या मातंग समाजावर उपासमारीची वेळ आली. तर कोरोना बाधित झालेले कुटुंबीय कर्जबाजारी होऊन सावकाराचे उंबरठे झिजवले. या समाजाला प्रवाहात आनण्यासाठी शासनाचे मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

प्रास्ताविक बाबासाहेब साठे यांनी शहरात महापौराच्या माध्यमातून मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी नुतन महापौर यांचे सहकार्य राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब शेलार यांनी केले. आभार उमेश साठे यांनी मानले.