पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे

सावेडी परिसरात चेनस्नॅकरांचा पुन्हा सुळसुळाट, एकाच दिवशी चार घटना

नगर : शहरासह सावेडी उपनगरामध्ये भरदिवसा चेनस्नॅकरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भर गर्दीत तसेच रहदारीच्या ठिकाणी ओढून नेण्याचे धाडस चोरांमध्ये निर्माण झाले आहे.  नगरसेवक स्वप्निल शिंदे, त्यांच्यावर पोलिसांचा कुठलाही धाक वा कुठलाही वचक नसल्यामुळे चेनस्नॅकींगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातवरण पसरले आहे तर महिलांना फिरणेही अवघड झाले आहे. यावर पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन महिलांना तसेच नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी मा. सभागृह नेते तथा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अमित गटणे व नागरिकांनी तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पी. आय. सुनील गायकवाड यांच्या निवेदनाद्वारे मागणी केली.

Also See this and subscribe

 

काल (दि.८) रोजी एकाच दिवशी सायंकाळी ५ वा. कोहिनूर मंगल कार्यालय परिसरामधून तोंड बांधलेले दोन चोर काळ्या रंगाची शाईन या दुचाकीवर महिलांना काकू काकू म्हणत आवाज दिला व गळ्यातील मंगळसूत्र तोडून फरार झाले. त्यानंतर लगेच ५.४0 वा.  नगरसेवक स्वप्निल शिंदे, प्रोफेसर कॉलनी चौकातील निर्मल डेअरी समोर रहदारी व गर्दीच्या ठिकाणी याच पद्धतीने आवाज देत गळ्यातील गंठण तोडून प्रेमदान चौकाकडे पसार झाले. त्यानंतर ५.५0 वा. आम्रपाली मंगल कार्यालया जवळून महिलेच्या गळ्यातील साखळी तोडून लंपास झाले. तसेच सकाळी बालिकाश्रम रोडवरही महिलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रकार घडला. या एकामागे एक असे चार घटना घडल्याने सावेडी परिसरातील महिलांमध्ये दहशत पसरली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी नगरसेवक स्वप्निल शिंदे, व शिष्टमंडळास यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक होईल, परंतु मुद्देमाल हस्तगत व्हायला वेळ लागतो. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी दक्ष नागरिक सुरक्षित नागरिक, अशासूचनांच्या फलक लावण्यात येत आहे.
तरी महिलांनी आपल्या गळ्यातील दागिन्यांची काळजी घ्यावी. रस्त्यावर शक्‍यतो एकटे जाणे टाळावे, असे ते म्हणाले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.