महापालिका कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांचे महापौरांना निवेदन

पाणीप्रश्न आणि इतर समस्या न सोडविल्यास "हंडा मोर्चा"

 अहमदनगर: वारुळाचा मारुति परिसरातील महापालिका घरकुल योजनेतील रहिवासी आणि पालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी, गेल्या चार वर्षांपासून तेथील सांडपाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. या भागात सेप्टिक टॅंक लहान असल्याने तो भरल्यानांतर ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या देखील भेडसावत आहे. पिण्याचे पाणी दोन दिवसाआड येत असल्याने या वसाहतीतील नागरिकांना पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागते.

Also see this and subscribe

 

 

मुख्य रस्त्यावर आणि आतील बाजूस लाईट नसल्याने लूटमार आणि दहशती वाढल्या आहेत. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने कारवाई न केल्याने या वसाहतीतील नागरिक आणि महिला यांनी आज महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्या सांगितल्या.  महापालिका  या वेळी महापौरांनी या समस्या सोडवण्यासाठी स्वतः वसाहतीत येऊ असे आश्वासन दिले. या समस्येवर तोडगा न निघाल्यास नागरिक हंडा मोर्चा करणार आहेत. त्याचसोबत २७ फेब्रुवारीला पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा दिलाय. या प्रसंगी संतोष ठोकळ, बाळासाहेब उमाप, राधा सोनावणे, अशोक गायकवाड, पोपट लोखंडे, एकनाथ नन्नावरे, गणेश चांदणे, भीमा खंडागळे, दत्ता देढे, भाऊ शेरकर, अभिजित चव्हाण, प्रभाकर पठारे, दत्तू आपटे, संतोष गाडे, रंगनाथ गाडे, शिवा गाडे, आदी उपस्थित होते.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.