आपल्या आवडीच्या खेळामधून विद्यार्थी करिअर शकतो : डॉ. सागर बोरुडे

धनुर्विद्यामधील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नगर : शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळावे. डॉ. सागर बोरुडे  या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी हा खेळापासून व मैदानापासून लांब होत चालला आहे. विद्यार्थी आपला बराचसा वेळ मोबाईलमध्ये घालवत आहे. आपल्या आवडीच्या खेळामध्ये विद्यार्थी करिअर करु शकतो. त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव देण्याचे काम करावे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. विविध क्रीडा संघटनांनी समाजामध्ये पुढे येऊन क्रीडा स्पर्धांचा आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ निर्माण होईल. अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटना व स्वराज्य क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान सावेडी यांनी जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे, असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले.

Also see this and subscribe

अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटना व स्वराज्य क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान सावेडी यांच्यावतीने १९ व्या जिल्हा स्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेचे (कुमारगट) उद्‌घाटन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे व मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शुभांगी रोकडे, सचिव अभिजित दळवी, सामाजिक प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा पल्लवी चव्हाण, रुपेश बेरड, सचिन घावटे, पांडुरंग उदे, योगेश वायकर, सागर चव्हाण, प्रतिक बनकर, रवी आमले, विजय गवळी, मिनित सोनवणे, अमित होनमाने, रणजीत सिंह वर्मा, मनोज काशीद आदी उपस्थित होते.
डॉ. शुभांगी रोकडे म्हणाले की, या स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड  करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ही १८-१९ फेब्रुवारी २0२१ रोजी संपन्न होणार आहे. धनुर्विद्या या खेळामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत भर पडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. असे ते म्हणाले.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.