सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला..  

न्यायधीश अमित शेटे यांच्या समोर सुनावणी

अहमदनगर :
 

नगर शहरातील केडगावमध्ये घडलेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात माजी उपमहापौर असलेल्या सुवर्णा कोतकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.  गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.  

कोतकर यांच्या वतीने ऍड. नितीन गवारे आणि सरकारी पक्षाकडून ऍड. केदार केसकर यांनी युक्तिवाद केला होता.  जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अमित शेटे यांच्या समोर या अर्जावर सुनावणी झाली होती.

या प्रकरणावर न्यायालयाने आज निकाल देत हा जामीन फेटाळला आहे.  गुन्हा दाखल झाल्यापासून सुवर्णा कोतकर या फरारी होत्या. मागच्या महिन्यात कोतकर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज केला होता.