क्रेडिट कार्डने पैसे आता थेट बँक खात्यात जमा!

हातात किंवा खात्यातही पैसे उरले नसतील तर अशा वेळीही क्रेडिट कार्डाचा उपयोग करता येतो. आपत्कालीन स्थितीत क्रेडिट कार्डाच्या सहाय्याने आपल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. एटीएमद्वारे कॅश ॲडव्हान्स घेता येतो, यासाठी क्रेडिट कार्डाचा पिन वापरावा लागतो. आपल्या बँकेच्या नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करून क्रेडिट कार्ड सेक्शनमधील फंड ट्रान्सफर या पर्यायाद्वारे थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. तसेच ई-वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे जोडून नंतर ते पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करता येतात. यासाठी लागू होणारे शुल्क तसेच व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे. अशा ट्रान्सफरमुळे क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्यावे.