जामीन मिळालेल्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींपासून पिडीत कुटुंबीयांना धोका

एक ते दीड महिन्यानंतरही अटक झाली नसल्याचा निषेध

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असून आरोपीला एक ते दीड महिन्यापासून पोलीसांनी अटक केली नसल्याने सदर आरोपीला अटकपुर्व जामीन मिळाला असून, आरोपी पिडीत कुटुंबीयांना धमकावून दशहत निर्माण करत असल्याचा आरोप करुन त्या आरोपींना जिल्हा बंदी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अनुसूचित जाती-जमाती आयोगाला पाठवून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली.

 

 

 

 

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागासवर्गीय समाजातील कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार कोथुळ (ता. श्रीगोंदा) घडला असल्याने पिडीत कुटुंबीयांच्या जिवीताला धोका असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, पिडीत कुटुंबीय आत्माराम धस, आनंद धस, शंकर पवार, वैभव पवार, मच्छिंद्र धस, बाळू धस, श्याम गायकवाड, दिगंबर धस आदी उपस्थित होते.

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.https://youtu.be/v5zr9yeNcJg

 

    कोथुळ (ता. श्रीगोंदा) येथे धस व लाटे परिवारात जागेच्या वादातून भांडण झाले. 23 जून रोजी सकाळी लाटे परिवाराने धस यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. सदर प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यासाठी जात असताना लाटे परिवारातील सदस्यांनी धस यांच्या अल्टो गाडीवर ट्रॅक्टर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धस कुटुंबीय मागासवर्गीय असल्याने त्यांच्यावर दहशत निर्माण करुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर शेण टाकण्यात आले. तर महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्यांचे कपडे फाडण्यात आले. सदर प्रकरणात धनंजय लाटे, मनोहर लाटे, सुधाकर लाटे, सुभाष लाटे, लक्ष्मण लाटे, मिराबाई लाटे, सोनाली लाटे (सर्व राहणार कोथुळ) यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (अ‍ॅ्ट्रोसिटी अ‍ॅोक्ट) कायद्यान्वये बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

 

 

 

 

गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून देखील आरोपी गावात सर्रास फिरत होते.  कुटुंबीयांना धमकावून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न लाटे परिवारातील आरोपी सदस्यांनी सातत्याने केला आहे. तसेच त्यांना गुन्हा मागे घेण्यासाठी जिवंत जाळण्याचा प्रकार देखील घडला असल्याचा आरोप पिडीत कुटुंबीयांनी केला आहे.आरोपींना सहज जामीन कशी मिळेल या पध्दतीने पोलीसांनी कलम लावण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड महिन्यापासून पोलीसांनी आरोपींना अटक केली नाही. आरोपींना अटक होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र आरोपी मोकाटच होते. नुकताच आरोपींना अटकपुर्व जामीन झाला आहे. मात्र सदर आरोपींपासून पिडीत कुटुंबीयांच्या जिवीताला धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अटकपुर्व जामीन झालेल्या आरोपींना जिल्हा बंदी करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.