अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट! डॉ. सुजित शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांना 2000 वृक्ष आणि 2000 वह्यांचे वाटप
2000 वृक्ष आणि 2000 वह्यांचे विद्यार्थ्यांना व गरजूना वाटप करण्यात आले.
अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट!
डॉ. सुजित शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांना 2000 वृक्ष आणि 2000 वह्यांचे वाटप ![📚]()
![🌳]()
शिरूर | शिवशाही वृत्तसेवा
नेहमीच समाजहितासाठी पुढाकार घेणाऱ्या अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम शिरूरमध्ये पार पडला! श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. सुजित शेलार यांच्या पुढाकाराने 2000 वृक्ष आणि 2000 वह्यांचे विद्यार्थ्यांना व गरजूना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविबापू काळे, जिल्हा उपाध्यक्ष महेशबापू ढमढेरे, तसेच महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस तृप्तीताई सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काकासाहेब खळदकर यांनी लोकसहभागातून शाळेच्या उर्वरित इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी CSR फंडातून मदतीची मागणी केली. महेशबापू ढमढेरे यांनी शिक्षणासाठी सहकार्याचे आश्वासन देत 5000 रुपयांची देणगी जाहीर केली.
रविबापू काळे यांनी देखील आमदार माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून CSR फंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
वृक्षारोपणासाठी 40,000 झाडांचा संकल्प घेतलेल्या उमेश रणदिवे यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजित शेलार यांनी केले. स्वागत प्राचार्य दिवे सर, सूत्रसंचालन व आभार चंद्रशेखर काकडे सर यांनी केले.
यावेळी गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली.
#AjitDadaBirthday #SocialImpact #TreeDistribution #NotebookDonation #YouthForNature #ShirurNews #NCPInitiative #EnvironmentMatters #PNBFD #TrendingNews


