दिल्लीगेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे शानदार उदघाटन
मंडळाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपाध्यक्ष ओमप्रकाश झिकरे यांच्या संकल्पनेतील देखावा सादर

2025 च्या गणेशोत्सवात दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जबरदस्त धमाका केला आहे. यंदा मंडळाने साकारला आहे खास हलता देखावा – “चांगदेव महाराजांचे गर्वहरण”. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्म सप्तशताब्दी वर्षानिमित्त हा देखावा उभारण्यात आला असून, चौथ्या दिवशीपासून गणेशभक्तांसाठी खुला करण्यात आला आहे.
ओपनिंग सेरेमनी:
उद्घाटन झाले खासदार निलेश लंके, आयुक्त यशवंत डांगे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या हस्ते.
यावेळी माजी नगरसेवक दिलीप सातपुते, योगीराज गाडे, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विनोद काकडे, अतुल पिंपरकर, अजय भोईर ओमप्रकाश झिकरे , बाळासाहेब सांगोळे , मंदार मुळे, ऍड अभिजित पुप्पल, अजित बोराटे, सलीम शेख साजिद सय्यद. अन्सार शेख, भगवान कोकणे, अजीज भैय्या सय्यद, प्रतीक बोडखे, अशोक पारधे, सुनील सुडके, संजय साळगावकर, नितीन पावले, सचिन पावले, निलेश कडवा, रोहन सांगोळे, अरिफ सय्यद, कार्यकर्त्याचा इथे सक्रिय सहभाग होता. गिरीश जाधव आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. 
हायलाइट्स:
मान्यवरांच्या हस्ते महारती आणि फित कापून देखाव्याचा शुभारंभ 
वाघावर स्वार होऊन येणारे चांगदेव महाराज आणि भिंत चालवत भेटायला गेलेले संत ज्ञानेश्वर – हा Iconic प्रसंग भन्नाटरीत्या दाखवला आहे 

उद्घाटनानंतर रुद्रवंश ढोल पथकाने तुफानी ढोल वादन करून सगळ्यांचं लक्ष वेधलं 
ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दिल्लीगेट परिसर दणाणून गेला 

संदेश:
खासदार निलेश लंके यांनी नगरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
तर आयुक्त यशवंत डांगे यांनी मंडळाच्या कामाचं कौतुक करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. विसर्जन पाचव्या आणि दहाव्या दिवशी कृत्रिम जलाशयातच करावं, असंही त्यांनी सांगितलं.
यंदाच्या गणेशोत्सवात दिल्ली गेट सार्वजनिक मंडळाचा देखावा नक्कीच Must Visit Spot ठरणार आहे.
गणपती बाप्पा मोरया!