अहमदनगर :
फराळाशिवाय दिवाळी हे समीकरणच जुळत नाही, काहीस गोड,काही तिखट ,व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे दिवाळीचे फराळ. हेच फराळ आता आपल्याला उपलब्ध झालं आहे नगरमधील कोठीरोड परिसरातील हेमराज केटरर्स यांच्याकडे.
हेमराज केटरर्स च्या वतीने दिवाळी निमित्त दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. १९९५ सालापासून हेमराज केटर्स तर्फे हा स्टॉल दरवर्षी लावला जातो, तब्ब्ल ४२ फराळाचे प्रकार याठिकाणी उपलब्ध आहेत.
पोह्यांचा चिवडा,चिरोटे, चकली ,वेवेगळ्या ४ प्रकारचे लाडूचे प्रकार, हरियाणाचे मठरी ,चकली, ६ प्रकारचे चिवडे, ६ प्रकारच्या शेव, शंकरपाळे, करंज्या ,अनारसे,बाकरवडी,बर्फी,लाडू,असे एक ना अनेक पदार्थ याठिकाणी उपलब्ध आहेत, महत्वाचे म्हणजे हे सगळे पदार्थ शुद्ध तुपातील आहे.
बऱ्यापैकि घरी बनवलेल्या पदार्थाचा वापर हे फराळ बनविण्यासाठी केला जातो. या कामामध्ये ४५ महिला आणि ३५ आचारी काम करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे याठिकाणी सर्व पदार्थ सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून बनवले जातात.
तसेच महोत्सवात येणाऱ्या सर्व नागरिकांना मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी त्या महोत्सवाचे लाभ घ्यावा असं आवाहन हेमराज केटरर्स चे हेमराज बोरा यांच्या वतीने करण्यात आलं आहे.
प्रसाद शिंदे,