अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा 

,"तुझ्या जागी मी असते तर..! "

शेवगाव :
मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने सागर लोधी लिखित ,“तुझ्या जागी मी असते तर..! ” या बालनाट्याचे वाचन करण्यात आले.
 आई आणि मुलींच्या जागा बदलल्या तर प्रत्येकीला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये सहज समजून त्यांच्यातील नाते अजून सुंदर होते हे या अभिवाचनातून ऐश्वर्या नाईकवाडी व मुग्धा घेवरीकर यांनी सुरेख वाचिक अभिवाचनातून प्रभावीपणे मांडले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. संयोजन नाट्य परिषदेचे पदाधिकारी उमेश घेवरीकर, मफीज इनामदार, भगवान राऊत, भाऊ काळे, भाऊसाहेब शिंदे व सुहास लहासे  यांनी केले.