दुबईमधील भारतीयांसाठी आता ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ सुविधा उपलब्ध!

संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) जाणाऱ्या भारतीयांना व्हिसाची गरज भासणार नाही. त्यांना दुबई किंवा प्रवेशाच्या इतर शहरांत व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा मिळेल. हा व्हिसा १४ दिवसांसाठी वैध असेल व त्याच कालावधीसाठी वाढवता येईल. तसेच ६० दिवसांसाठी नॉन-एक्स्टेंड व्हिसाचा पर्याय असेल. तथापि, त्यांना यूएईच्या नियमांनुसार लागू शुल्क भरावे लागेल. ही सुविधा भारतीय पासपोर्टधारक, यूएस, यूके वा ईयू देशांतील कायमस्वरूपी रहिवासी, ग्रीन कार्डधारक किंवा वैध व्हिसाधारकांसाठी उपलब्ध असेल. सुविधेसाठी प्रवेशाच्या तारखेपासून किमान ६ महिन्यांसाठी पासपोर्ट वैध असणे आवश्यक आहे.