मतदान वाढविण्यासाठी मतदान केंद्रांवर मर्जिंग!
संगमनेर विधानसभा मतदारसंघात १० नवीन मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांची गर्दी होणाऱ्या १३ ठिकाणी मतदान केंद्रांवर मर्जिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान वाढेल, अशी माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण २८८ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ९ मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे तर १६ मतदान केंद्रांच्या इमारती बदलण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेला तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे, नायब तहसीलदार संदीप भांगरे आदी उपस्थित होते.
◆ मर्जिंग करणे म्हणजे काय?
मर्जिंग करणे म्हणजेच शेजारीशेजारी असलेल्या दोन मतदान केंद्रांपैकी एका मतदान केंद्रावर अधिक मतदारांची नावे असतील आणि दुसऱ्या मतदान केंद्रावर कमी नावे असतील, त्यापैकी जास्त नावे असलेल्या मतदान केंद्रातील काही मतदारांची नावे शेजारच्या मतदान केंद्रात समाविष्ट केले जातात.