अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ सिनेमाचं फर्स्ट पोस्टर रिलीज

मुंबई :
 
बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याला त्याच्या आगामी रामसेतू चित्रपटाचे शुटींग अयोध्येत करण्यास परवानगी मिळाली आहे.  या चित्रपटाचे पोस्टर आणि फोटो अक्षयने नुकताच शेअर केला होता.   उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या भेटीवर मुंबई येथे गेले होते तेव्हा अक्षय कुमार ने त्याची भेट घेतली होती त्यावेळी ही परवानगी त्याने मागितली असे समजते.  

अक्षयने योगींची भेट घेतल्याने चर्चेला सुरवात झाली होती पण आता या बातमीने त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  पोस्टरमध्ये अक्षय एका प्रवाशाची भूमिका साकारताना दिसत आहे, तर त्याच्या मागे श्रीरामाची प्रतिमा आहे.  सिनेमात अक्षयचा लुकही बदललेला आहे. यावेळी तो लांब केसांमध्ये दिसणार आहे.  

ट्विटरवर सिनेमाचं पोस्ट शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘या दिवाळीला भारत राष्ट्राचे आदर्श आणि महानायक श्रीरामाचे रक्षण करणारा पूल आणि भगवान श्रीरामाच्या आठवणींना युगानूयुगं लक्षात ठेवण्यासाठी एक असा सेतू बनवू जो येणाऱ्या पिढींना रामाशी जोडेल. या प्रयत्नात आमचाही एक छोटासा संकल्प. राम सेतु.  आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’ असं ट्विट त्याने केलं आहे.