तस्लीमा नसरीन म्हणाल्या की शोबीझपेक्षा धर्म ही चांगली जागा नाही

चित्रपटसृष्टी सोडणाऱ्या कलाकारांना लेखिका तस्लीमा नसरीन यांचा टोला....

 

बांगलादेशमधील  प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन  या अनेकदा धर्माच्या मुद्यावर बेधडकपणे आपले मत व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये असेच बेधडक वक्तव्य केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बरेच वापरकर्ते यावर नकारात्मक प्रतिक्रियादेखील देत आहेत. तस्लीमा यांनी आपल्या या ट्विटमध्ये शोबीज म्हणजे मनोरंजन विश्वाला धर्मापेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. आपल्या ट्वीटमध्ये तस्लीमा यांनी आपल्या या ट्विटमध्ये ज्यांनी मोठा पडदा सोडून, धार्मिक गुरूंचा आश्रय घेतला किंवा धर्माच्या मार्गाकडे वाटचाल केली, अशा कलाकारांची नावे घेऊन  त्यांना टोला लगावला आहे.

यामध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. तस्लीमा यांनी ट्विटमध्ये नाव घेतलेल्या सेलिब्रिटींमध्ये विनोद खन्ना, सुचित्रा सेन, जायरा वसीम आणि नुकतीच बॉलिवूडला ‘अलविदा’ म्हणणारी अभिनेत्री सना खान यांचा समावेश आहे. तस्लीमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये “विनोद खन्ना, सुचित्रा सेन, अनु अग्रवाल, बरखा मदन, सना खान, जायरा वसीम, शबाना, व्हॅनिटी, ख्रिस टकर, अँगस जोन्स, नरगिस, कर्क कॅमेरून, मॉन्टेल जॉर्डन, जुनैद जमशेद, कॅट स्टीव्हन्स .. या सर्वांनी धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडले. धर्म हे मनोरंजन व्यवसायापेक्षा चांगले स्थान नाही. काही लोकांना याबद्दल पश्चातापही झाला असेल,”असं लिहिलंय.

तस्लीमा नसरीन यांच्या या वादग्रस्त ट्विटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यावर तस्लीमा नसरीन यांनाच बोल लगावले आहेत. तर काही वापरकर्त्यांनी त्याच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.