स्व. माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्तांना अन्नधान्य सुपूर्द
माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य व किराणा शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी दु. १२ वा. हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.
ऋषिकेश राऊत
माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य व किराणा शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी दु. १२ वा. हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलतांना मुकेश दादा मुळे म्हणाले की, हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचे सदस्य तण, मन, धनाने कामे करतात. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहचविण्याचे काम ही संस्था करते. आपण पुण्यतिथी, जयंती वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करतो पण आजच्या घडीला महाराष्ट्रात कोरोना व महापूर हे दोन मोठे संकट उभे आहेत. या संकटात गरजवंतांना मदत कार्य करण्याचे काम प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही इथून पुढेही कायम करत राहू असे ते म्हणाले.
प्राचार्य एम. एन. तांदळे, विश्वस्त प्राचार्य लालचंद हराळ, प्रा. सुनिल म्हस्के, प्रा. सुधाकर सुंबे आदींची भाषणे झाली. यावेळी सिताराम मुळे, नंदेश शिंदे, मनोज गुजराथी यांच्यासह स्व. माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान व हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दि. १४ ऑगस्ट रोजी स्व. माधवरावजी मुळे यांच्या जयंती निमित्त हे वाटप करण्यात आले. स्व. माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेली मदत टेम्पोतून हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुपचे पदाधिकारी कोकणाकडे रवाना झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. प्राचार्य लालचंद हराळ यांनी आभार मानले.