युवकांनी व्यवसायाचे धोरण अवलंबवावे : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

भिंगार येथे मित-आदर्श रेस्टॉरंटद्वारे १२व्या नगरी चहाचे उद्घाटन

नगर : नगरी चहाच्या माध्यमातून युवकांना व्यवसायामध्ये संधी उपलब्ध झाली आहे. युवकांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसायामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. नगरी चहा हा
अल्पावधीतच शहरामध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरला असल्यामुळेच ठिकठिकाणी नगरी चहाच्या शाखा सुरू होत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. भिंगार येथे पाथर्डी रोडवर मित-आदर्श रेस्टॉरंटद्रारे १२व्या नगरी चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंगेश पालवे, अमोल शिंदे, गणेश आढाव, फिरोज शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.

Also see this and Subscribe 

 

यावेळी बोलताना गणेश आढाव म्हणाले की, युवकांना स्वयंरोजगाराची विविध साधने स्वतःच्या संकल्पनातून निर्माण करावी. भविष्यात नोकऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत: इतरांना रोजगार निर्माण करुन देण्याचे ध्येय व त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी तरुणांनी ठेवावी, व्यवसाय करीत असताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व कष्टाच्या बळावर व्यवसाय द्रिगुणित केला पाहिजे. ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसायात भरभराटी आणावी. व्यवसाय करीत असताना युवकांना विविध क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळत असतो.  मंत्री शिवाजीराव कर्डिले  समाजामध्ये काम करीतअसताना कसे आचरण करावे, लोकसंवाद कसा साधावा व ग्राहकांना कसे समाधान मिळवून देता येईल, या गोष्टीचा अनुभवही मिळतो, असे ते म्हणाले.  यावेळी बोलताना मंगेश पालवे म्हणाले की, नगरी चहाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करू. त्यांना चांगल्या दर्जेची सेवा देऊ. चहाचे ५४ प्रकार उपलब्ध असून ग्राहकांना प्रत्येक चहाचा स्वाद येथे घेता येईल. नगर शहराप्रमाणेच भिंगारमध्येही नगरी चहाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करू असे ते म्हणाले. यावेळी अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.