आर्किटेक्ट, इंजिनिअर सर्व्हेअर असोसिएशन यांच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्टील व सिमेंट दरवाढीबाबत निवेदन

भाववाढ नियंत्रित करण्यासाठी नियंत्रण प्राधिकरणाची नियुक्ती करावी

नगर : सिमेंट, स्टील, उत्पादन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण देशात सिमेंट व
स्टिलच्या किमतीमध्ये मनमानी पद्धतीने भाववाढ करत आहेत. त्यामुळे घराच्या व बांधकाम
प्रकल्पाच्या किमती वाढत आहे. या भाववाढीमुळे शासनाबरोबरच सर्वसामान्यांनाही याची झळ
बसत आहे. केंद्र सरकारने ही भाववाढ नियंत्रिक करण्यासाठी नियंत्रण प्राधिकरणाची नियुक्ती
करावी, अशी मागणी आर्किटेक्ट, इंजिनिअर सर्व्हेअर असोसिएशन यांच्यावतीने नगरविकास मंत्री
एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिमेंट व स्टीलची भाववाढ थांबवावी,
यासाठी आर्किटेक्ट, इंजिनिअर सर्व्हर असोसिएशनच्यावतीने निवेदन संस्थेचे अध्यक्ष सलीम
शेख, उपाध्यक्ष विजयकुमार पादीर, सचिव अन्वर शेख, खजिनदार प्रदीप तांदळे, यश शहा,
विनोद काकडे यांनी निवेदन दिले.

Also see this and subscribe

यावेळी सलीम शेख म्हणाले की, कोरोना व लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायावर मरगळ
आलेली असताना स्टिल व सिमेंटच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे हा व्यवसाय अडचणीत
सापडला आहे. सिमेंटची जवळपास २५ टक्के तर स्टिल ५० टक्के महाग झाले आहे. कंपन्यांची
मनमानी वृत्ती थांबली पाहिजे. परदेशामध्ये निर्यातीच्या नावाखाली तुटवडा दाखवून मनमानी
पद्धतीने कंपन्या भाववाढ करत आहेत. त्वरित भाववाढ कमी झाले नाही तर संपूर्ण देशातील
बांधकाम थांबविण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टील व सिमेंटच्या दरवाढी संदर्भात लवकरच ठोस
निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या संघटनेस दिले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.