सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, याचा भरवसा नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही युझर्सने आपलं एखादं म्हणणं मांडावं आणि ते काही लोकांना पसंत पडावं. झालंच तर मग… त्यापाठीमागून अनेक लोक त्या विषयांवर वेगवेगळे ट्विट करतात, तश्या पोस्ट शेअर करतात. आताही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतोय. एका महिला शेतकरी नेत्याचा आंदोलनादरम्यान सँडल गायब झाल्यानंतर तिने सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. ह्याच आरोपांना घेऊन सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झालाय .
सोशल मीडियावर महिला शेतकरी नेत्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिला नेत्या गीता भाटीचा सँडल गायब झाला आहे. त्यानंतर गीता भाटीने सरकार आणि पोलिसांवर आरोप करताना म्हटलं आहे, “सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा”. गीता भाटीच्या हास्यास्पद आरोपानंतर ट्विटरवरील युझर्सने #’गीता भाटी का सँडल वापस करो’ नावाने ट्रेंड केला आहे.