प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया व राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!

मुंबई :  
 

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला घरबसल्या समजेल त्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.   त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक  भाषेत आले तर…?  प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील.  मात्र लवकरच प्रेक्षकांना आता आपली हक्काचं  माध्यम उपल्बध होणार आहे.  मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे.  

 
‘लेटसअप’ या इन्फोटेनमेंट व न्यूज अॅपच्या प्रचंड यशानंतर सुप्रसिद्ध उद्योजक, ‘महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष, निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियो फाऊंडर व संस्थापक राहुल नार्वेकर त्यांच्या ‘लेट्सफ्लिक्स’ या नव्या मराठी ओटोटीच्या निमित्ताने OTT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच ‘लेटसअप’ या अ‍ॅपला AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge अंतर्गत ‘आत्मनिर्भर अ‍ॅप पुरस्कार’ मिळाला. 
 
 मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी देखील त्यांच्या हक्काचं ओटीटी माध्यम मराठीमध्ये घेऊन येण्याचा निर्णय फिरोदिया यांनी  घेतलाय .  नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर आणि सिनेइंडस्ट्री यांचं नातं फार जुनं आहे. नरेंद्र फिरोदिया हे ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ यांसारखे अनेक प्रोजेक्ट्सचे प्रमुख आहेत.‘अहमदनगर महाकरंडक’ या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे ते अध्यक्ष आणि प्रायोजक देखील आहेत. ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’ या मराठी सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे.
 
स्वतंत्र ओटीटी सुरु करणे हे चॅलेंजिंग तर आहेच पण या माध्यमातून मराठी टॅलेंटसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असं सांगताना नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितलं आहे.