पुणे :
कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणाऱ्या वैद्यकीय, पोलिस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक अरुण खोरे, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, मनिषा उगले आदी उपस्थित होते.
परभन्ना फाउंडेशचे संस्थापक प्रा. गणेश चप्पलवार हे यावेळी म्हणालेत, समाजात वावरत असताना आपल्या परिसरात अनेक सामाजिक, आर्थिक, कौंटुबिक मदत परभन्ना फौंडेशनने केली. माझे आजोबा परभन्ना चप्पलवार यांच्या समाजकार्य, मदती विषयी लोकं भरभरून बोलतात तेव्हा मला अभिमान वाटते. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची रिघ पुढे नेत त्यांच्याच नावाने फाउंडेशन सुरू करून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपापल्या परिने मदत व सेवा केली. यात वैद्यकीय, पोलिस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील लोकं पुढे होते. अशाच काहींना कृतज्ञता पुरस्कार देऊन करण्यात आले असल्याचे चप्पलवार यांनी सांगितलं आहे.
यावेळी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, पत्रकार सागर आव्हाड, सचिन सुंबे, सुमित आंबेकर, शेख अस्लम, नरहरी कोलगाने, ओपन लायब्ररी चळवळच्या अध्यक्षा प्रियांका चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल काळे, प्रमिला लोहकरे, सुंदराबाई अंबरनाथ कोकणे, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव, ऍड. वाजेद खान यांच्यासह कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबियाचाही सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक अवचार यांनी केले तर विजय गायकवाड यांनी आभार मानले.