ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन अनंतात विलीन

अहमदनगर : 
 
रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे.   ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे.  जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांनी  त्यांच्या कारकिर्दीत दीडशेहून अधिक नाटके आणि २०० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्यात.  
 
 दोन वर्षापूर्वी त्यांना राज्य शासनाकडून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीचा पुरस्कार देऊन गौरव केला होता.  सध्या झी मराठी वाहिनीवर गाजत असलेली “  अग्ग बाई सासूबाई” या मालिकेत ते सोहमच्या अर्थात बबड्या च्या आजोबांची भूमिका सकारात होते.   “आरण्यक”, “हृदयस्वामिनी”, “मुद्राराक्षक”, “कौन्तेय”, या काही नाटकांतील त्यांच्या भूमिका  विशेष गाजल्या. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.