कै.रावसाहेब तथा गणपत राजाराम म्हस्के स्मृती दिनानिमित्त न्यू आर्टस् महाविद्यालय अहमदनगर यांच्या वतीने अभिवादन.
रावसाहेबांनी शिक्षणाचा पाया घातला म्हणूनच आज मराठा विद्या प्रसारक समाज भक्कम पायावर उभे
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
गुरुवार दि.२९/७/२०२१ रोजी कै.रावसाहेब तथा गणपतराव राजाराम म्हस्के पाटील यांचा ४४ वा स्मृती दिन आहे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि विशेषतः दुष्काळी आशा पाथर्डी तालुक्यातील जनते साठी आवर्जून आठवण ठेवावी असा आजचा दिवस आहे.
कै, रावसाहेबांच्या कार्याची आठवण करून द्यावी असे मुळीच नाही परंतु रावसाहेबांची आठवण काढावी असे मात्र नक्कीच आहे
एक कार्यक्षम आमदार म्हणूनच रावसाहेबांना लोक आठवणीत ठेवणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी रावसाहेबांनी शिक्षणाचा पाया घातला म्हणूनच आज मराठा विद्या प्रसारक समाज भक्कम पायावर उभे राहून या जिल्ह्याचे शैक्षणिक नेतृत्व करीत आहे.
अशा शिक्षणमहर्षीस न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य डॉ.भास्कर झावरे सर,यांनी आदरणीय रावसाहेबांच्या पवित्र पुण्य स्मृतीस अंतःकरण पूर्वक अभिवादन केले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब सागडे, डॉ.अरुण पंधरकर, डॉ. संजय कळमकर,ज्यूनिअर काॅलेजचे उपप्राचार्य भाऊसाहेब कचरे महाविद्यालयाचे रजिस्टार श्री बबन साबळे, सिनेट सदस्य श्री.शिवाजी साबळे अधिक्षक श्री परशुराम म्हस्के,श्री जगन्नाथ सावळे,सिताराम मुळे, रविंद्र वरपे,इ.शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..