पुणे :
पुण्यातील फुलेवाडयावर महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध संघटना ,राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी हजेरी लावली. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही फुलेवाडयाला भेट देऊन महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली.
पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची सेवा केली. प्रसंगी त्यांना प्लेगची लागण झाली, यात त्याचा मृत्यु झाला . अशा दांपत्यामुळे पुण्याला वेगळी ओळख मिळाली . त्याच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा काम ओबीसी समाज करेल. सध्या विरोधक खुपचा आक्रमक झाले आहेत पण हे सरकार पाच वर्षै पुर्ण करेल आणि विरोधकाचे काम हे विरोध करणे असुन त्याचा कोणताही फरक या सरकारवर पडणार नाही. अस मत छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.