राजकोट :
राजकोट मधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात काल अचानक आग लागली आहे. या लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही .
मावडी भागातील उदय शिवानंद रुग्णालयात आज पहाटे ही दुर्घटना घडली. आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी सहा जण थोडक्यात बचावले तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.