जामखेडमध्ये हरकतींचा पाऊस!
ZP आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जामखेड तालुक्यातून तब्बल ४० हरकती दाखल!

ZP आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जामखेड तालुक्यातून तब्बल ४० हरकती दाखल!
१४ जुलैला जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती – आणि जामखेडकरांनी ती फुल्ल वापरली!
जिल्हाभरातून एकूण ८८ तक्रारी, त्यातील जामखेड एकटाच ४० वर!
बाकी तालुक्यांची स्थिती:
- अकोले: ८
- संगमनेर: ६
- कोपरगाव, राहाता, कर्जत: ३
- अहिल्यानगर: ९
- पारनेर: १३
- श्रीगोंदा, राहुरी: १
- श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी: शून्य!
एकाच गटासाठी अनेकांनी हरकती दाखल केल्याने जामखेडमध्ये वादळ उठलंय!
पुढे काय? आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या टेबलावर या हरकतींचं नियोजन!