महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! सीएम फडणवीस अलर्ट मोडवर 

 सर्व यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले.

🌧️
🚨 महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! सीएम फडणवीस अलर्ट मोडवर 🚨🌧️

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. कोकण, विदर्भ, मराठवाडा या भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात तातडीची बैठक घेतली आणि सर्व यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले⚠️

👉 बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, IT मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे ACS दीपक कपूर, कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
👉 सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले.

📊 परिस्थिती अपडेट्स

  • हवामान खात्याचा अंदाज : 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा 🚨
  • रत्नागिरी, रायगड, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
  • गेल्या 2 दिवसांत पावसाशी संबंधित घटनांत 7 मृत्यू ☹️
  • कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली 🌊
  • जळगावात मोठं नुकसान, तर अलमट्टीसंदर्भात कर्नाटक सरकारशी सतत संपर्क

🏠 विदर्भ + मराठवाडा हानी

  • प्राथमिक अंदाजानुसार विदर्भात 2 लाख हेक्टर पिकांचे नुकसान 🌾
  • संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित 🏚️
  • दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क

🚆 मुंबई अलर्ट

  • आज सकाळी अवघ्या 8 तासांत 170 मिमी पाऊस 🌧️
  • शहरात पाणी तुंबल्याने दोन ठिकाणी वाहतूक ठप्प 🚦
  • रेल्वे, मेट्रो मात्र सुरुच 🚇
  • पुढील 10-12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे – सीएम ⚠️
  • स्थानिक प्रशासनाला शाळा बंद ठेवण्याचे स्वातंत्र्य 📚

📢 सीएम फडणवीस यांचे आदेश व सूचना

  • एसएमएस अलर्ट पाठवताना वेळ अचूक द्या ⏰
  • नागरिकांनी अलर्ट गांभीर्याने घ्यावेत 🙏
  • तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही – स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध 💰
  • घरांच्या पडझडीचे पंचनामे योग्यरित्या करा 📝
  • पर्यटक ठिकाणी पोलिसांनी सतर्क राहावे 🚔
  • दरडी कोसळण्याच्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत ठेवा 🪨
  • निवारा केंद्रांत भोजन, पाणी, पांघरूणांची सोय करा 🍲💧

👉 मुख्यमंत्री म्हणाले : “जनतेची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. कृपया हवामान खात्याच्या सूचना पाळा आणि स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्या.”

⚠️💧 Metro Portal अपील : महाराष्ट्रातील जनतेनो, कृपया बेफिकीर न होता सुरक्षित राहा. नद्या-ओढ्यांकडे जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासन सज्ज आहे पण तुमची सावधगिरी हीच खरी ताकद आहे. 🙌

 

#MaharashtraRain #DevendraFadnavis #HeavyRainAlert #MumbaiRains #FloodUpdate