जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेद हॉस्पिटल मधील परिचारिकांचा सन्मान
कोरोना संकटात काळातील परिचारिकांचे योगदान समाजासाठी महत्त्वाचे-आ.अरुणकाका जगताप
अहमदनगर प्रतिनिधी,
कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. माणूस माणसापासून दूर गेला असतानाही परिचारिकांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून समाजाची सेवा केली,आरोग्य क्षेत्रांमध्ये परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. परिचारिकांनी कोरोना संकट काळात आपले योगदान यशस्वी रित्या राबविल्याने अनेक कोरोना बाधित रुग्ण हे ठणठणीत बरे होऊन आनंदाने घरी परतले, जय आनंद फांऊडेशन वर्षभर विविध सामजिक उपक्रम राबवून आपले योगदान देत असतात असेच काम इतर संस्थांनी पुढे येऊन समाजासाठी करावे असे प्रतिपादन आ.अरुणकाका जगताप यांनी व्यक्त केले.
परिचारिका दिनानिमित्त आयुर्वेदिक हॉस्पिटल मधील परिचारिकांचा जय आनंद फाउंडेशन वतीने सत्कार करताना आ.अरुण काका जगताप,नगरसेवक विपुल शेटीया, मर्चंट बॅंकेचे संचालक कमलेश भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारक,महावीर बोरा,अमित काबरा,श्रेनिक शिंगवी, आनंद चोपडा,विनोद कटारिया, संभाजी पवार,भुपेंद्र परदेशी,डॉ.समीर होळकर, प्राचार्य डॉ. निंबाळकर तसेच परिचारिका उपस्थित होत्या.
हे ही पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा
यावेळी बोलताना कमलेश भंडारी म्हणाले की,मानवी जीवनावर आलेल्या कोरोना संकटकाळात परिचारिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे,आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये जय आनंद फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी नगर जिल्ह्यातील प्रथम खाजगी कोविड सेंटर सुरू केले होते, अनेक कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका परिचारिकांनी बजावली, आज परिचारिका दिन आहे या दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान करणे गरजेचे आहे,शहराचे आ. अरुणकाका जगताप व आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो असे ते म्हणाले.