अहमदनगर :
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आम्ही हे काम केले आहे. प्रत्येक सणाचे आपल्याकडे आगळे महत्व आहे.प्रत्येक सणाला एक धार्मिक अंग आहे. त्याचबरोबरच सामाजिक भानही या सणातून खऱ्या अर्थाने साजरी होती ती दिवाळीच दिवाळी सण म्हणजे दुसऱ्याचे दु:ख अथात दुसऱ्याच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमय करायचे असे प्रतिपादन डॉ. सुनीता अकोलकर यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन डॉक्टस विंग अहमदनगरच्या वतीने District Probation and Aftercare association’s शिशगृहातील १ ते १० वयोगटातील मुलांकरीता वस्तुरुप देणगी ( ब्लॅंकेट्स, मोठे व छोटे स्वेटर, लॅक्टोडेक्स LBW दूध पावडर डबे,Good night मशीन व रिफिल,बेडशीट,बाळांचा वजन काटा ) देण्यात आली. यावेळी विंगच्या अध्यक्षा डॉ. सुनीता अकोलकर,सचिव डॉ. सोनाली वहाडणे व डॉ. कांचन रच्चा, शिशुगृहाचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम कानवडे, शिशुगृह मॅनेजर सौ. शितल प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विंगच्या अध्यक्षा डॉ. सुनीता अकोलकर होत्या.
डॉ.सोनाली वहाडणे म्हणाल्या, समाजातील सर्वानी एकत्र येण्यासाठी दिवाळी हा सण आहे.आनंद देण्याचा व दुख कमी करायचे आहे.चिमुकल्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा सर्वोत्तम आहे.
भारतीय संस्कृतीत दुसऱ्यांसाठी जगण हेच खरं जगण असते.आपल्या मदतीमुळे एखादयाच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.गोरगरीबाची सेवा ही खरी ईश्वरसेवा आहे.
डॉ. कांचन रच्चा यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक महेश ढेरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुगृहाचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम कानवडे यांनी केले. मान्यवरांचे आभार शिशुगृह मॅनेजर सौ. शितल प्रभुणे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. विंगचे चेअरमन डॉ.सरिता बांगर,डॉ.दिपाली फडके,डॉ.आरती होशिंग,डॉ.शैलेजा होशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.