स्नेहालय,बाल निरिक्षण गृह,अनाम प्रेम सह इतर ८ संस्थांचे वंचित मुलांसमवेत लायन्सचा ११वा दीपोत्सव साजरा

हाथातील दिव्यानी उजळले परिसर

अहमदनगर (प्रतिनिधी) :
रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, तुरळक फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेल्या आकाश दिव्यानी उजळलेले आसमंत, हातात असलेल्या दिव्यांनी उजळले परिसर तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला.  निमित्त होते लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवाभावी संस्था व शासकीय बाल निरिक्षण समितीचे दीपोत्सव-२०२० चे.   ८ विविध संस्थेत एकाच दिवशी सरकारी नियम पाळून आयोजित दीपोत्सव स्नेहालयासह, अनाम प्रेम, मुलींचे वसतिगृह राहुरी, मनसेवा प्रकल्प, स्नेह अंकुर, बालभवन, बाल निरिक्षण गृह व विविध संस्थेतील ७०० विद्यार्थी आप आपल्या परिसरात सहभागी झाले होते.
दीपोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने लायन्सचे उपप्रांतपाल लायन हेमंत नाईक, डॉ.एस.एस. दीपक, शरद मुनोत, मोहनसेथ मानधना, ॲडव. श्री जयवंत भापकर, अडव. सौ ममता नंदनवार हस्ते दीपप्रज्वलन झाले.  यावेळी  लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार सुधीर लांडगे, प्रकलप प्रमुख किरण भंडारी, आनंद बोरा, डॉ. सिमरन वधवा, धनंजय भंडारे, हरजीतसिंह वधवा, निरंजन सेवा संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा, किरण दीपक, ज्योती दिपक, सतीश बजाज, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, स्नेहालयच्या अनिल गावडे, उद्योजक लायन सतीश राजहंस, मुकुल धूत आदींसह ठराविक सदस्य व सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष अमित बडवे व प्रशांत मुनोत यांनी केले.  डॉ. बडवे यांनी वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.  तसेच करोना काळात सर्व शासकीय नियानुसार आयोजित करणे हे एक आव्हानच होते परंतु कार्यक्रमात खंड पडू दिले नाही असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष हरजीतसिंह वधवा तसेच डॉ. सिमरन वधवा यांनी क्लबच्या वतीने चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.  दीपोत्सवाचे हे ११ वे वर्ष असल्याचे श्री वधवा यांनी स्पष्ट केले.
डॉ.दीपक म्हणाले की, हिरा बना आणि चमकून सत्य व प्रामाणिकपणाला जीवनात अनन्यसाधारण महत्तव आहे असे करून दाखवा.  मोहन सेठ यांनी प्रमाणिकपणा यशस्वी जीवनाचा पाया असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना चांगले नागरिक म्हणून घडण्याचे आवाहन केले.  सकाळी ९ वाजल्या पासून लायन सदस्य प्रत्येक संस्थेला भेट देऊन सुरु केलेल्या  दीपोत्सव कार्यक्रमात चाईल्ड लाईन, बालभवनच्या विद्यार्थ्यांसह, श्रीगोंदा, उत्कर्ष बालभवन, युवान, स्नेहालय रिहाब सेंटर, शासकीय बालगृह, अनाम प्रेम, मणसेवा प्रकल्प, गाडगे महाराज, संस्थेचे सुमारे ६०० विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या प्रणगणात सहभागी झाले होते.
लायन हेमंत नाईक यांनी हे जीवन सुंदर आहे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वत:ची क्षमता ओळखण्याचे आवाहन केले.  प्रत्येकाच्या जीवनात कठिण प्रसंग येत असतात.  मात्र आलेल्या कठिण परिस्थितीचा सामना करीत हसता आले पाहिजे. प्रत्येकामध्ये काहीणाकाही सर्वोत्कृष्ट गुण असून, ते ओळखून जीवनाची वाटचाल करण्याचा त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
डी जे च्यां तालावर हिंदी, मराठी चित्रपटांच्या गीतांवर विद्यार्थ्यांसह उपस्थित पाहुण्यांनी ठेका धरला होता.  सैराटच्या झिंगाट या गाण्यावर विद्यार्थ्यां मध्ये स्फुर्तीमय चैतन्य संचारले होते.  दीपोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या किल्ला बनवा व ग्रीटिंग कार्ड स्पर्धेतील विजेत्यांची नांवे घोषित करण्यात आली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला बंधनकारक राहून विद्यार्थ्यांना एकत्रित न अणात दिवाळीचा, फराळाचा आणि आतषबाजीचा मनसोक्त आनंद लुटला.  स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता. तर हातातील दिव्यांनी परिसर उजळून निघाला.  यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल बागुल यांनी केले. आभार सुधीर लांडगे यांनी मानले.  यावेळी धनंजय भंडारे, किरण भंडारी, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी, कमलेश भंडारी, सतीश बजाज, मुकुंद धूत, डॉ. मीरा बडवे, डॉ. प्रिया मुनोत, सौ भावना लांडगे आदीसह लायन्स, निरंजन संस्था, चाईल्ड लाईन व स्नेहालयाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद पारगावकर, जस्मीत सिंग वधवा ,  सहज कोर वधवा, राजबीर सिंग संधू, सुमित लोढा, मनीषा सोमानी, संदेश कटारिया, विपुल शाह, सुनील छाजेड, डॉ. संजय असणानी, सुमित लोधा,डॉ. हेमंत नाईक, पियूष खंडेलवाल आदींनी प्रयत्न केले.