वर्षानुवर्षे जोपासलेल्या चोपड्या सिनानदीत विसर्जित करण्याची घोषणा

भारतातील मानसिक गुलामगिरी बडवे प्रवृत्तीमुळे जोपासली गेली

अहमदनगर  (संस्कृती रासने )

जन्मावर आधारित जातीय व्यवस्था, महिलांना दुय्यम दर्जा हे वैश्‍विक माहिती गंगा व वैश्‍विक चैतन्याच्या विरोधात असल्यामुळे यासंदर्भातील वर्षानुवर्षे जोपासलेल्या चोपड्या सिनानदीत विसर्जित करण्याची घोषणा पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

 

हे ही बघा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

देशात हजारो वर्षे जन्मावर आधारित जातीय व्यवस्था पोसली गेली व ती आजही असतित्वात आहे. स्त्रियांना समाजात दुय्यम दर्जा देण्यात येत असून, मानवी गुलामगिरी सुरु आहे. कॉन्टम फिजिक्स, इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन थेरीमुळे संपूर्ण विश्‍व वैश्‍विक माहिती गंगेच्या तत्वावर चालते त्याला वैश्‍विक चैतन्याची साथ आहे. ही बाब गणिताने सिद्ध झाली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जन्मावर आधारित जातीय व्यवस्था, महिलांना दुय्यम दर्जा बंद होण्यासाठी वर्षानुवर्षे जोपासलेल्या चोपड्या विसर्जित होण्याची गरज आहे.

 

 

यासाठी वैश्‍विक माहिती गंगा व वैश्‍विक चैतन्याचा स्विकार करण्याची गरज असून, यामुळे जगातील इतर देशापेक्षा सर्वच बाबतीत भारत देश पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील मानसिक गुलामगिरी बडवे प्रवृत्तीमुळे जोपासली गेली आहे. शिक्षण माहितीपासून संपूर्ण देश हजारो वर्षे वंचित राहिला. त्यामुळे देशाचा विकास खुंटला. वैश्‍विक माहिती गंगा व वैश्‍विक चैतन्याचा दैनंदिन जीवनात समावेश झाल्यास क्रांतिकारक बदल होणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या उपक्रमासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.