अवैध शस्त्र मोहिमेअंतर्गत १० गुन्हेगार जेरबंद

७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, ३ तलवारी जप्त

   अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                       नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहीमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना तपासून एकूण ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, आणि तीन तलवारी जप्त करून १० गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय. या आरोपींमध्ये श्रीरामपूर , नेवासा आणि राहुरी तालुक्यातील आरोपींचा समावेश आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

                                या गुन्हेगारांची माहिती संकलित करून उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपूर आणि अहमदनगर यांच्याकडून सर्च वॉरंट घेण्यात आले. या नंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, दीपाली काळे, संदीप मिटके आणि पथकाने ही कारवाई केली. आज सकाळपासून श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरी या भागात आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात  आलेय.