अहमदनगरच्या खेळाडुंची इंदापुरात बाजी

इंदापूर येथिल राज्य कुराश स्पर्धेत यंग मेन्स ज्युडो क्लबचे उत्तुंग यश खेळाडूंनी जिंकली ६ सुवर्ण पदके, ३ रौप्य पदके व ५ कास्यपदके

अहमदनगर – शहरातील खेळाडुंनी इंदापुरात बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथे २७ व २८ जुलै रोजी झालेल्या सब ज्युनिअर राज्य कुराश अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्यपदके पटकावले आहे. या स्पर्धेत १० वर्षाखालील २५ किलो वजन गटात पार्थ दातरंगे याने सुवर्णपदक मिळवले तर श्लोक सब्बन याने कांस्यपदक जिंकले आहे, ३० किलोच्या वरील गटात सम्राट करंजुले याने आरामात सुवर्णपदका वर आपले नाव कोरले असुन, बारा वर्षाखालील वयोगटात ब्रिजेश उर्फ कान्हा मुनगेल याने ३० किलो वजन गटात सुवर्णपदक तर अनुज बोगा याने रौप्य पदक जिंकले आहे. ३५ किलो खालील वजन गटात विराट करंजुले याने सुवर्णपदक जिंकत, ५० किलो वरील गटात ओम पोकळे याने सुवर्णपदक जिंकले आहे. तर मुलींच्या ३६ किलो खालील गटात गार्गी मुळे हिने कांस्यपदक जिंकले आहे. तसेच १४ वर्षाखालील गटात ऋचा बोगा हिने ४४ किलो खालील गटात सुवर्णपदक तर ४८ किलो वजन गटात अबोली बेरड हीने रौप्य पदक जिंकले आहे, तर ५२ किलो खालील गटात सिद्धी दातरंगे हिने कास्य तर श्रुती गव्हाणे हिने ५२ किलो वरील गटात रौप्य पदक जिंकले आहे. मुलांच्या ३५ किलो खालील वजन गटात वेदांत आठरे व युवराज चौधरी यांनी कास्यपदक पटकावले आहे. वरील सर्व यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक श्री संजय धोपावकर आणि आंतररष्ट्रीय खेळाडू आदित्य संजय धोपावकर, कनिष्ठ मार्गदर्शक श्री शुभम दातरंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे असे विजेत्यांचे मत आहे. संघ व्यवस्थापक म्हणून आर्यन आगरकर व स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून सोनाली साबळे आणि अथर्व नरसाळे यांनी काम पाहिले आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी व कुराश -अध्यक्ष सचिन जाधव यांनी विशेष अभिनंदन केले आहे.