अहिल्यानगर जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम!
तुमचं मत पोलिसांपर्यंत थेट पोहोचवा – क्युआर कोड किंवा लिंकद्वारे!

तुमचं मत पोलिसांपर्यंत थेट पोहोचवा – क्युआर कोड किंवा लिंकद्वारे!
३० जून ते ९ जुलै २०२५
नागरिकांना आता वाहतूक, महिला सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी कारवाई व सायबर गुन्हे याबाबत आपला अभिप्राय थेट देण्याची संधी!
लिंक येथे आहे:
https://www.ahmednagardistpolice.gov.in/feedback-form
या अभिप्राय मोहिमेचे वैशिष्ट्ये –
कोणताही वैयक्तिक तपशील देण्याची गरज नाही
संबंधित पोलिस ठाण्याचं नाव अनिवार्य
५० शब्दांत अभिप्राय द्या
पोलिस कामगिरीसाठी १० पैकी रेटिंग द्या
४ विभागांसाठी स्वतंत्र गुणांकन –
वाहतूक व्यवस्थापन
महिला सुरक्षा
अंमली पदार्थविरोधी कारवाई
सायबर गुन्हे
सर्व अभिप्राय गोपनीय ठेवले जातील, म्हणून निःसंकोचपणे तुमचं मत मांडा!
SP सोमनाथ घार्गे यांचा पुढाकार
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई
पोलिस प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचा प्रयत्न
नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल अभिप्राय उपक्रम