कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात? कार्ड गेम व्हिडीओवरून राष्ट्रवादीत खदखद!
आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही कारवाईचे संकेत दिले आहेत.

विधिमंडळात मोबाईलवर “कार्ड गेम” खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू असताना, आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही कारवाईचे संकेत दिले आहेत.
रोहित पवारांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर, “शेतकरी संकटात असताना मंत्री मात्र खेळण्यात गुंग” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
सुनील तटकरे यांचा इशारा:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की –
“कोकाटेंनी जे केलं ते अयोग्य. पक्ष याबाबत योग्य निर्णय घेईल.”
त्याचप्रमाणे, लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर सूरज चव्हाण यांनी केलेली मारहाण देखील पक्ष गांभीर्याने घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांचा असंतोष:
मे महिन्यात अवकाळी पावसामुळे पेरण्या खोळंबल्या, शेतकरी अडचणीत आहेत. अशा काळात कृषीमंत्री गंभीर नसल्याचे चित्र उभे राहिल्यामुळे कोकाटेंच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
#BreakingOnMetroPortal
कृषिमंत्री कोकाटेंच्या “गेम”मुळे मंत्रीपदाचा “एंड गेम”?
पक्षाकडून कारवाईच्या हालचाली सुरू!
ही बातमी शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा!
#ManikraoKokate #CardGameControversy #NCP #MetroPortalNews #PoliticalBuzz #MaharashtraPolitics
शेतकऱ्यांचा असंतोष: