“राज्यात दहशतवाद आणि गुंडागिरी भाजप पुरस्कृत!” — बाळासाहेब थोरातांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला!
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जबरदस्त टीका केली

संगमनेर | देशोन्नती वृत्तसंकलन
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. विधानसभेतील राडा, आमदारांच्या गुंडगिरीच्या घटना आणि राज्यातील वाढती असुरक्षितता यावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले —
“राज्यात सध्या जी दहशतीची आणि गुंडगिरीची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती भाजप पुरस्कृत आहे!”
थोरातांचं सडेतोड मत –
विधिमंडळात आमदार ‘कार्ड गेम’ खेळतात…
काही पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतात…
वेटरला मारहाण, सरपंचाची हत्या, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले – हे सगळं सत्तेच्या मुभेनेच होत आहे.
“भाजपनं काही गुंड आणि वाचाळवीरांना खुलेआम परवानगी दिली आहे. सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचे धागेदोरे तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.” – थोरात
“खोटी आश्वासने, खोटं सरकार!”
लाडकी बहिण योजना – २१०० ची घोषणा, पण १५०० चाही वेळेवर पत्ता नाही.
शेतकऱ्यांची कर्जमाफी – फक्त कागदोपत्री.
दररोज लाभार्थ्यांची नावं गायब – विश्वासघात सुरूच आहे.
“शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या नावाने खोटं बोलून भाजप सत्तेवर आली. आता मात्र ना जबाबदारी, ना उत्तरदायित्व!” – थोरात
विधानसभेतील राड्यावर थेट आरोप
“मी चाळीस वर्षे आमदार आहे, पण इतकी विकृत राजकीय संस्कृती कधी पाहिली नाही. आता विधानसभेतच गुंड उतरले आहेत – आणि सरकार त्यांना संरक्षण देते.”
मारहाण करणाऱ्यांना संरक्षण, मार खाणाऱ्यांना शिक्षा?
“हे जनतेनं वेळीच ओळखायला हवं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
थोरातांचं सडेतोड मत –
“खोटी आश्वासने, खोटं सरकार!”
विधानसभेतील राड्यावर थेट आरोप