बहीणीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन भावांसह तिघांचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
मयत तीनही मुले आपल्या आईला मदत करण्यासाठी सोबतच होते.
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
कपडे धुण्यासाठी आईसह घरातील कुटुंबा सोबत गेलेल्या खर्डा येथील तीन शालेय विद्यार्थींचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना खर्ड्यापासुन तीन कीमी अंतरावर शिर्डी-हैदराबाद महामार्गावरील आंतरवाली फटा येथील पाझर तलावात घडली आहे. या घटनेने खर्ड्यासह जामखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिपक ज्ञानेश्वर सुरवसे, (भाऊ) (16 वर्षे) इयत्ता दहावी, सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (बहीण) (14 वर्षे ) इयत्ता आठवी तर कृष्णा परमेश्वर सुरवसे, (चुलत भाऊ) (16वर्षे ) इयत्ता दहावी तीघे रा.खर्डा आसे आसे बुडून मृत्यू झालेल्या तीघांची नावे आहेत.
या बाबत समजलेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील वृध्द व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे सुरवसे कुटुंबातील महीला या आज ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी सुतक फेडण्यासाठी खर्ड्यापासुन तीन कीमी अंतरावरील आसलेल्या आंतरवाली फटा येथील पाझर तलावात घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी
कुटुंबातील महीला कपडे धुत आसताना दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कु.सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हीचा पाय घसरला व ती पाण्यात पडली मात्र तीला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागली ही गोष्ट तीचे भाऊ दिपक ज्ञानेश्वर सुरवसे व कृष्णा परमेश्वर सुरवसे यांच्या लक्षात आल्यावर दोघाही भावांनी तीला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. शेवटी तेही पाण्यात बुडाले यावेळी ही गोष्ट त्या ठिकाणी कपडे धुत आसलेल्या मयत सानिया व दिपक यांच्या आईच्या लक्षात आल्यानंतर ती देखील मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरली मात्र त्या वेळी मुलांची आई देखील पाण्यात बुडत असताना आजुबाजूला आसलेल्या लोकांनी मुलांच्या आईला वाचवण्यात यश मिळविले. मात्र या घटनेत तीनही बहीण भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
तीनही मुले पाण्यात बुडाली आल्याने कपडे धुण्यासाठी आलेल्या महीलांनी आरडाओरड केला. ही घटना वाऱ्यासारखी खर्डा शहरात पसरली यानंतर घटनास्थळी खर्डा माजी उपसरपंच भागत सुरवसे, योगेश सुरवसे, लखन नन्नवरे,बिबीशन चौगुले ,मयुर डोके बाबासाहेब डोके , विशाल मुरकुटे, यांनी धाव घेऊन बुडालेल्या मुलांना पाण्यातून बाहेर काढले व खर्डा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र पुर्वीच तीघांचा मृत्यू झाला आसल्याने त्यांना शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीनही मुलांचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी केले व तीनही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आले.
दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आ. रोहित पवार, प्रा.मधुकर राळेभात, रमेश आजबे, मंगेश आजबे, सुनिल लोंढे, श्रीकांत लोखंडे ,प्रकाश गोलेकर , महालिंग कोरे, वैभव जामकावळे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली. या प्रकरणी बिभीषण नामदेव चौघुले यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदरची घटना भुम हद्दीत घडली आसल्याने जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी झिरो नंबरने आंबी पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आसल्याने खर्डा व जामखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .