सिंहगड रोड परिसरातील मोक्का कायदा अंतर्गत अटक आरोपीस जामीन मंजुर

आरोपी हा येरवडा कारागृहात होता.

पुणे- सिंहगड रोड
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दहशत माजवून जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणातील आरोपी गणेश म्हसकर (रा. माणिकबाग) व त्याचे इतर साथीदार यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. सदरील कार्यवाही नंतर आरोपी हा येरवडा कारागृहात होता.
यावेळी आरोपीने ॲड.आदेश चव्हाण व ॲड. सुलेमान शेख यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
आरोपीचे वकील ॲड.आदेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.
यावेळी आरोपीची वकील यांना ॲड. उत्कर्षा नलावडे यांनी विशेष सहकार्य केले.