नंदिनी अशी बनली सर्वात तरुण महिला सीए

सीए परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग क्लास न लावता मिळवलं यश

एक काळ असा होता की, जेव्हा चंबळ खोऱ्यातील मुरैना हे नाव ऐकलं की, मनात बंदुका, दरोडे असं भयावह चित्र उमटायचे पण काळानुसार येथे बरेच काही बदललेले आहे. नंदिनी अग्रवाल ही तरुणी या बदलाचे एक भक्कम उदाहरण ठरले आहे. मध्यप्रदेशच्या मुरैना या छोट्याशा जिल्ह्यातली, मुलगी नंदिनी 2021 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत संपूर्ण भारतात 83 हजार उमेदवारांमधून प्रथम आली आहे. अवघ्या 19 वर्ष 330 दिवसांच्या वयातील सीए झाली आहे. अलीकडेच तिचं नाव जगातील सर्वात तरुण महिला सीए म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवले गेले आहे.