खास महिला वर्गाच्या फिटनेस आणि वर्क आउट साठी जी के फिटनेस जिम सुरु

प्रख्यात कुस्तीपटू अंजली देवकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

अहमदनगर (प्रतिनिधी): आपल्या फिटनेस आणि वर्क आउट  बाबत जागरूक असणाऱ्या महिला आणि युवतीवर्गासाठी एक आनंदाची बातमी … नगर कल्याण रस्त्यावर खास महिलासाठी सेपरेट जिम सुरु होतो आहे . या ठिकाणी राहणारे सुप्रसिद्ध कुस्तीपटू भैरवनाथ खंडागळे यांच्या सुनेने हा जे के फिटनेसमध्ये हा जिम साकारलाय .

प्रख्यात कुस्तीपटू अंजली देवकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

नगरमधील फिटनेस आणि वर्क आउट एक्स्पर्ट आंतराष्ट्रीय ख्यातीच्या कुस्तीपटू शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू पैलवान अंजली देवकर यांच्या हस्ते या जिमचे उदघाटन होणार आहे.  यावेळी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे तसेच सचिव कैलास दळवी यावेळी उपस्थित राहणार आहेत .

 

येथील  फिटनेस आणि वर्कआउट एक्स्पर्ट, प्राध्यापिका सौ .  नीलम गणेश खंडागळे यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक आणि फिटनेस एक्स्पर्ट  या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे.

Also See This And Subscribe:

 

सध्याच्या काळात आपल्या फिटनेस बाबत आणि सुडौल निरोगी शरीराबाबत महिला वर्गात चांगलीच जागृती झाली आहे. नगरमध्ये याविषयी प्रशिक्षण देणारे आणि वर्कआउट करणारे अनेक ट्रेनिंग सेंटर्स आहेत . मात्र महिलांसाठी स्वतंत्र जिमची सुविधा उपलब्ध नसते त्यामुळे या ठिकाणी जाण्यास महिलावर्गाची कुचंबणा होते . ही बाब लक्षात घेऊन प्रा सौ खंडागळे यांनी खास महिलासाठी वेगळी व्यायामशाळा सुरु करण्याचे मनावर घेतले .

 

Like This And subscribe Also 

कल्याण रोडवर महिलांची झाली व्यायामाची सोय

 खंडागळे परिवाराने देखील नीलम यांच्या  संकल्पनेला मान्यता देऊन तिला जिम सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा जिम महिलांसाठी खुला करण्यात येणार आहे.  नगर कल्याण रस्त्यावर भल्या पहाटे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी बाहेर पडतो .  आता या सर्व महिलांना या ठिकाणी खास महिला ट्रेनर कडून ट्रेनिंग मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यंत्र सामुग्री येथे बसविण्यात आल्या आहेत .  सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळात महिलांसाठीच्या स्वतंत्र जिम मध्ये महिलाना व्यायाम करता येणार आहे.  परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी केली तरी तरी महिलावर्गाने एकदातरी भेट द्यावी आणि आपला आहार, न्यूट्रीशियन  याबाबत  माहिती घ्यावी असे आवाहन सौ नीलम खंडागळे यांनी केले आहे.

 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.