वैष्णवी अत्री  ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” ची मानकरी!!!

पुण्यात "महाराष्ट्र आयकाॅन 2020" फॅशन शो 

पुणे 

नुकताच पुण्यातमध्ये पार पडलेल्या मिस्टर,  मिस,  मिसेज महाराष्ट्र आयकाॅन 2020 या स्पर्धेत वैष्णवी अत्री हिने ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” हा किताब पटकवला.  लाॅकडाऊन नंतर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फॅशन शो चे आयोजन ममता राजपूत यांनी केले होते. वैष्णवी ने संपूर्ण लॉकडाऊन मध्ये स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देवून या स्पर्धे साठी तयारी केली.

वैष्णवी सिंहगड महाविद्यालयात आर्किटेक्ट चे शिक्षण घेत आहे.  वैष्णवी ने विविध फॅशन ब्रॅण्ड,  प्रोडक्ट  साठी काम केले आहे. ती एक उत्तम परफार्मर देखील आहे.  तिला या स्पर्धेसाठी तिचे आई आरती अत्री,  वडील राजेश अत्री यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बहिण जानव्ही कुमार ,किरण भाटीया,  मित्र सत्यजीत कराळे पा.  यांचे सहकार्य लाभले. वैष्णवी ने हा किताब पटकवल्या बद्दल सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व मित्र परिवाराने वैष्णवी ला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.