मधुर भांडारकरांच्या आरोपांनंतर करण जोहरचा माफीनामा

शीर्षक बदलण्यास नकार

मुंबई :

बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी निर्माता करण जोहरवर शीर्षक चोरीचा आरोप लावला होता.  तसेच, वेब सीरीजचे शीर्षक बदलण्याची मागणी देखील केली होती. अखेर करण जोहरने नमते घेत मधुर भांडारकरची जाहीर माफी मागितली आहे.  मात्र, शीर्षक बदलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

 

शीर्षक चोरी प्रकरणी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी काल) पुन्हा एकदा ट्विट केले होते.  त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘19 नोव्हेंबरपासून धर्मा मुव्हीजला अनेक नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत.  त्यापैकी दोन आयएमपीए, एक आयएफटीडीए आणि दोन नोटीस एफडब्ल्यूईसीने पाठवल्या आहेत.  या सर्व नोटिसा ‘बॉलिवूड वाईफ्स’ या चित्रपटाचे शीर्षक हस्तगत केल्याबद्दल पाठविल्या गेल्या आहेत.  परंतु, यापैकी कोणत्याही नोटिसांवर धर्मा प्रोडक्शनने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिले नाही.’